येशूची खरी गोष्ट
येशूची खरी गोष्ट पहा.
या पृष्ठाला भेट दिली
लोकांनी प्रार्थना केली
जर तुम्ही तारणाची प्रार्थना केली असेल तर तुम्ही आता देवाचे मूल आहात.
“येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्या मुखाने’ कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा ‘आपल्या अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.”
रोम. 10:9
तुमच्या तारणासाठी तुम्ही या क्षणी आमच्यासोबत प्रार्थना करू शकता:
प्रिय देवा,
मी कबूल करतो की येशू हा प्रभू आहे. माझा विश्वास आहे की तो एका कुमारिकेच्या पोटी जन्मला, माझ्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला. आज, मी कबूल करतो की, मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे, आणि मी स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाही. मी तुला विनंती करतो की मला क्षमा कर आणि मी केवळ येशूवर विश्वास ठेवतो. माझा विश्वास आहे की, मी आता तुझे मूल आहे आणि मी तुझ्याबरोबर अनंतकाळ घालवीन. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे मला दररोज मार्गदर्शन कर. तुझ्यावर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती करण्यास व जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करण्यास मला मदत कर. तुझा पुत्र येशू ह्याच्या रक्ताद्वारे माझे तारण केल्याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमेन.